Viral News : या पोरांचा भलताच स्वॅग! 3 कोटींच्या कारमध्ये बसून विकताय चहा? कोण आहेत हे ऑडी चहावाले

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही दोन मुलांनी चहाचा असाच छोटाचा व्यवसाय सुरु केलाय
Viral News
Viral Newsesakal

Viral News : भारतातल्या एकूण लोकसंख्येतील मोठा वर्ग हा चहा पिणारा असून चहा प्रेमींचा भारतात अजिबातच कमतरता नाही. त्यामुळे देशात चहाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही दोन मुलांनी चहाचा असाच छोटाचा व्यवसाय सुरु केलाय. पण यांच्या व्यवसायात विशेष म्हणजे हे दोघे ३ कोटींच्या ऑडीमधून चहा विकताय.

सध्या देशात चहाचे स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या कल्पनाही समोर आल्या, ज्या खूप लोकप्रिय झाल्या. अशाच एका कल्पनेने आज आर्थिक राजधानी मुंबईत दोन तरुण चहा विकत आहेत. त्यांच्या कामाची खूप चर्चा होत आहे. हे दोन तरुण ऑडी कारमध्ये चहा विकतात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Viral News
Viral News

'ऑडी चायवाला' नावाने सुरू झाला स्टॉल

'ऑडी चायवाला' अमित कश्यप आणि मन्नू शर्मा यांनी सुरू केला आहे. या दोन्ही तरुणांनी मुंबईतील लोखंडवाला बॅकरोड येथे चहाची टपरी लावली. दोघांनीही मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू केले आहे. तो म्हणतो की तो नवीन आणि वेगळ्या मार्केटिंग धोरणाचा भाग म्हणून ऑडी वापरत आहे. (Startup)

Viral News
Viral News : या माणसाचा जगण्याचा फंडाच वेगळा! तब्बल 17 वर्षांपासून फक्त कोल्ड ड्रिंक्सवर जीवंत

दोन्ही तरुण हरियाणाचे रहिवासी आहेत

अमित कश्यप आणि मन्नू शर्मा हे हरियाणाचे रहिवासी आहेत. दोघेही काही महिन्यांपूर्वी मुंबईत आले होते. दोघांनी इथे येऊन काहीतरी वेगळे काम सुरू करण्याचा विचार केला.

यानंतर अमित आणि मन्नू यांनी मुंबईतील लोकांना हरियाणवी चवीचा चहा देण्याचा निर्णय घेतला आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या गाडीत चहा विकण्यास सुरुवात केली. मुंबईतल्या या चहा विक्रेत्यांवर लोकांना खूप प्रेम आहे. ऑडी चायवालाच्या स्टॉलवर लोकांची गर्दी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com