
Viral Video: अपघात कसा आणि कधी होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे अपघात होण्यापेक्षा आधीच दक्षता घेतली तर सुखरूप घरी पोहोचता येईल.पण काही मंडळी याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील असल्याचे सांगितले जात आहे. एक व्यक्ती रेल्वेतून खाली पडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.