
esakal
Trending Video : सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं ही गोष्ट नवीन नाही, पण अलीकडे मुंबईतील एका प्रमुख बसस्थानकावर घडलेल्या घटनेने मात्र मर्यादांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे. १८ सप्टेंबरला दिवसा गर्दीच्या वेळी, एका तरुण-तरुणीने बसस्थानकातच एकमेकांशी अत्यंत जवळीक दाखवली. त्यांच्या या वर्तनामुळे आजूबाजूच्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. काहींनी "अरे काहीतरी लाज ठेवा!" असं म्हणत नाराजी व्यक्त केली तर काहींनी थक्क होत त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.