Viral Video : लोकलचा जीवघेणा प्रवास अन् धडपडणारा बाप...; गर्दीत खाली बसून डबा खाणाऱ्या मुंबईकराचा केविलवाणा व्हिडिओ व्हायरल

Emotional Viral Video Mumbai Local Man Eating Food : मुंबई लोकलमध्ये जमेल तिथे टिफिन उघडून दोन घास खाणाऱ्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेलं एक हृदयस्पर्शी वास्तव या व्हिडिओतून दिसत आहे
Emotional Viral Video Mumbai Local Man Eating Food
Emotional Viral Video Mumbai Local Man Eating Foodesakal
Updated on

Viral Video Mumbai Local Man Eating Tiffin : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो लोक स्वप्नांच्या शोधात धाव घेतात. या गर्दीच्या आणि गडबडीच्या शहरात प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो पण एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये असते

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे जो केवळ एक दृश्य नाही, तर लाखो कष्टकरी मुंबईकरांच्या जीवनातील वेदना व्यक्त करणारा क्षण आहे.

घराची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, महागाई आणि रोजचा संघर्ष या सगळ्याच्या ओझ्याखाली दडलेला एक माणूस तो दिसतोय फक्त टिफिन खाताना, पण त्यामागे आहे अख्खं आयुष्य.
हे दृश्य अनेकांच्या काळजात घर करतं कारण ते आपल्या आजूबाजूला रोज घडतं, फक्त आपलं लक्ष जात नाही.

“आपल्या जीवाची पर्वा न करता, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यासोबत धावणाऱ्या वडिलांचं आयुष्य,” असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. आणि खरंच हा माणूस कोणाचातरी वडील, नवरा, भाऊ किंवा मुलगा असू शकतो.

Emotional Viral Video Mumbai Local Man Eating Food
दोन वर्षात 23 गर्लफ्रेंड; हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा इम्रान कोण? फोटो आणि व्हिडिओतून धक्कादायक माहिती उघड

या व्हिडिओमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती लोकलच्या गजबजलेल्या डब्यात, जमेल तिथे खाली बसून टिफिनमधील जेवण उरकताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण समाधानही आहे की निदान दोन घास खायला मिळाले.

या व्हिडिओखाली अनेक जणांनी भावनिक कमेंट्स केल्या."वडिलांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे","माझे वडील नाहीत, पण आज त्यांचं महत्त्व समजलं","वडील म्हणजे आधारवड",
अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या कारण या व्हिडिओने लोकांच्या अंत:करणाला स्पर्श केला आहे.

Emotional Viral Video Mumbai Local Man Eating Food
Strawberry Moon : आज भारतात दिसणार स्ट्रॉबेरी मून; 18 वर्षानंतर दुर्मिळ योग, कुठे अन् किती वाजता पाहाल? जाणून घ्या

महिलांच्या संघर्षाविषयी बरेच बोललं जातं आणि ते योग्यच आहे. पण पुरुषांचंही एक न बोललेलं वास्तव असतं, जे त्यांनी स्वतःलाही कधी सांगितलेलं नसतं. समाज, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि स्वप्नांच्या ओझ्याखाली त्यांचं अस्तित्व हरवतं आणि अशा क्षणांत त्यांच्या आयुष्याचं एक चिटपाखरू आपल्या नजरेसमोर उभं राहतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com