
किन्नौरमधील होजिस लुंगपा नाल्याला ढगफुटीमुळे महापूर आला, ज्याने रस्ते आणि पूल उद्ध्वस्त केले.
भारतीय सैन्याने रात्रीच्या काळोखात ड्रोन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चार कामगारांची सुटका केली.
स्थानिक प्रशासन आणि सैन्याच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली, परंतु रस्त्याच्या कामाचे मोठे नुकसान झाले.
Himachal Padesh Floods Trending Video : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात बुधवारी (१३ ऑगस्ट २०२५) सायंकाळी अचानक आलेल्या महापुराने हाहाकार उडाला. होजिस लुंगपा नाल्याला ढगफुटीमुळे पूर आला, ज्यामुळे सतलज नदीवरील पूल वाहून गेला आणि रस्त्याच्या कामात गुंतलेल्या चार कामगारांना जीवघेणा धोका निर्माण झाला. या संकटात भारतीय सैन्याने वेळीच धाव घेत चार जणांचे प्राण वाचवले. सैन्याच्या या शौर्याला आणि तत्परतेला सलाम.