

AI-generated image depicting a leopard causing chaos, similar to those used in recent viral fake videos spreading panic about big cats in urban areas
esakal
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक धडकी भरवणारा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लग्नसमारंभात अचानक एक बिबट्या घुसतो, जेवणाच्या टेबलावर ठेवलेले पदार्थ नासधूस करतो आणि उपस्थित लोक घाबरून इकडे-तिकडे पळू लागतात. गाणी, स्माइल आणि आनंदाने गजबजलेला लग्नाचा दिवस एका क्षणात थरारक चित्रपटात बदलतो. लोक ओरडतात, टेबल उलटतात आणि बिबट्या इकडे तिकडे पळताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना खरी घटना वाटते आणि ते घाबरून शेअर करतात.