

पैसे घ्या पैसे...अस तुम्हाला कोण म्हटलं तर तुमच्या भुवया उंचावतील. पैसा ही काय भाजी आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर असं एक ठिकाण आहे जिथं भाज्यांचा नव्हे तर पैशांचा बाजार भरतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला याबद्दल अनेक प्रश्न पडले असतील. तर जाणून घेऊया नेमका विषय आहे तरी काय? (viral video money is marketed like vegetables In Bangladesh )
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पैशांचा भरलेला बाजार दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बांग्लादेशचा आहे. हा व्हिडीओ हर्ष राय नावाच्या एका तरुणाने शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मार्केटच्या मध्यभागी डझनभर टेबल्स लावण्यात आले आहेत, ज्यावर नोटांचे बंडल ठेवण्यात आले आहेत. या नोटांचे बंडल विकायला लोक बसले आहेत. वृद्ध लोक तेथे पोहोचतात आणि दुकान मालकाकडून चलनी नोटा घेतात.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनात तुमच्या अनेक प्रश्न उपस्थित झाले असणार. तुम्ही विचार करत असाल की, या नोटा खरेदी कशा करतात. तर यामागचे सत्य असे की, जुन्या फाटलेल्या नोटांच्या बदल्यात या नोटा खरेदी करता येतात. हा व्हिडिओ बांगलादेशातील असला तरी भारतातही अनेक ठिकाणी अशा जुन्या फाटलेल्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा मिळतात.
भारतात, बहुतेक लोक असे काम करण्यासाठी नोटा बदलण्याची दुकाने उघडतात, जिथे ते फाटलेल्या नोटांच्या बदल्यात लोकांना चांगल्या नोटा देतात. मात्र, हे सर्व फुकटात मिळत नाही, उलट फुटलेल्या नोटांच्या बदल्यात कडक नोटा घेण्यासाठी दुकानदारांकडून ठराविक कमिशन आकारले जाते. मात्र, बांगलादेशातील हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.