

Viral Video Mother Dolphin
esakal
Heartbreaking Dolphin Video : निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो, तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो. याचा प्रत्यय मंगळवारी (ता. १६) तळाशील किनारी आला. एका मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिन माशाला वाचवण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली धडपड आणि एका मोठ्या डॉल्फिनने त्याला आपल्या पाठीवर घेत दिलेला अखेरचा आधार पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले.