Viral Video: सोहळा ट्विन्स नातवंडांच्या स्वागताचा पण चर्चा निता अंबानींची! नेटकऱ्यांचं लक्ष होतं ते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video Of Nita Ambani

Viral Video: सोहळा ट्विन्स नातवंडांच्या स्वागताचा पण चर्चा निता अंबानींची! नेटकऱ्यांचं लक्ष होतं ते...

Nita Ambani: आशियातील श्रीमंतांच्या यादीत ज्यांची गणना होते ते मुकेश अंबानी सध्या त्यांच्या बिझनेस घडामोडींबरोबरच त्यांच्या जुळ्या नातवंडांमुळेही चर्चेत आहेत. अमेरिकेहून परतलेल्या ईशाचं तिच्या जुळ्या मुलांसह काल जंगी स्वागत करण्यात आलं. यानिमित्तान ३०० किलो सोन्याचं दानही करण्यात आलं. मात्र सोशल मीडियावर कालपासून निता अंबानी का चर्चेत आल्या ते आपण जाणून घेऊया.

जुळ्या नातवंडांची आजी निता अंबानीचा आनंद तर गगनात मावेनासा होता. ईशाच्या मुलांसह निता अंबानी तीन नातवंडांच्या आजी झाल्या आहेत. तीन नातवंडांची आजी असलेल्या निताच्या मॉडर्न लूकची यावेळी सर्वत्र चर्चा चालली होती.

निता यांनी पिंक रंगाचा टॉप पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. नातवंडांच्या जंगी स्वागतात त्यांचं हे सिंपल लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं. तीन नातवंडांची आई टॉप आणि पँट घालून अगदीच तरूण दिसत होती. त्यांच्या या लूकला बघून त्या तीन नातवंडांच्या आजी आहेत असे मुळीच कोणाला वाटणार नाही.

काय आहे निता अंबानींच्या सौंदर्याचं रहस्य?

निता अंबानी या ५८ वर्षाच्या आहेत. मात्र यावर कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. त्यांच्यासारखं सौंदर्य तुम्हालाही हवं असेल तर जाणून घ्या त्यांचं ब्यूटी सीक्रेट

असे आहे निता यांचं डाएट आणि फिटनेस रूटीन

निरोगी जीवनासाठी नीता अंबानी रात्री लवकर झोपतात आणि सकाळीही लवकर उठतात. त्यांच्या सकाळची सुरूवात एक कप चहा आणि पाण्याने होते. त्या ज्या चहा पितात तो साधासुधा चहा नाही. त्यांच्या एका कप चहाची किंमत ऐकून तुम्हालाही घाम फुटेल. त्यांच्या एक कप चहाची किंमत ३ लाख एवढी आहे.

हेही वाचा: Isha Ambani's Twins : ईशा अंबानीच्या बाळाची पहिली झलक!

चहानंतर त्या सुका मेवा खातात. तर नाश्त्यात त्या अंड्याचा पांढरा भाग खातात. तर दुपारच्या जेवणात त्या हिरव्या भाज्या आणि सूप घेतात. संध्याकाळी देखील त्या हेल्दी सूप घेतात. आणि रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या असतात.

निता अंबानी नेहमी डिटॉक्स पाणी पितात. त्या पाच प्रकारचं डिटॉक्स ड्रिंक घेतात. बीटरूट ज्यूस, पालकाचा ज्यूस, नारळ पाणी इत्यादींचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर त्या दररोज ४० मिनीटे व्यायामदेखील करतात.

टॅग्स :mukesh ambaniCelebration