Viral Video : 'Fast & Furious' हॉलीवूड चित्रपटातील सीन पाहून चोरट्यांनी पळवलं 'एटीएम'; बघा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ सप्टेंबरच्या रात्री पहाटे ३ वाजता घडली.
Viral Video
Viral Video esakal

Viral Video Of Thieves : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. दोन मुखवटा घातलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कारचा वापर एटीमम मशिन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची दखल घेतल्याने हा डाव फसला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ सप्टेंबरच्या रात्री पहाटे ३ वाजता घडली.

दोन्ही चोरट्यांनी महाराष्ट्रातील येलमबाघाटा परिसरात कारचा वापर करून महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन कसेतरी उखडून पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस घटनास्थळी आल्याचे पाहून चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या शोध घेण्यास सुरुवात केली.

हॉलीवूड चित्रपटातला सीन बघून चोरट्यांनी लढवली शक्कल

हा दरोडा म्हणजे लोकप्रिय हॉलीवूड चित्रपट ‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपटातील एका सीन बघून त्याचीच नक्कल करण्यात आलीय. त्यात बँकेच्या तिजोरीच्या चोरीचा समावेश असलेले असेच दृश्य दाखवण्यात आले. (Viral Video)

Viral Video
Video Viral: 'वन नेशन वन इलेक्शन'चे काय होतील फायदे? मराठी मुलीने दिलं सडेतोड उत्तर; व्हिडिओ होतोय व्हायरल

याआधीही घडल्या दरोडेखोरीच्या घटना

याआधीही, आणखी एका विचित्र घटनेत, नशेत असलेल्या दोन व्यक्तींनी दिल्लीच्या रस्त्यावर एका जोडप्याला लुटण्याच्या उद्देशाने गाठले. या घटनेचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवरील दोन हल्लेखोर बंदुकीच्या जोरावर जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

दरोडेखोरांपैकी एक व्यक्तीचे खिसे बघण्यासाठी पुढे जात होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दरोडेखोरांना हा जोडप्याकडे २० रुपयांच्या नोटेशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. हे पाहिल्यानंतर दरोडेखोरांनी जोडप्यालाच 100 रुपयांची नोट दिली. हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com