Viral Video : तरुणीनं ब्रेकऐवजी दाबला एक्सीलेटर; पुढे जे झालं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : तरुणीनं ब्रेकऐवजी दाबला एक्सीलेटर; पुढे जे झालं...

Viral Video : अनेकदा मुलीच्या ड्रायव्हिंगवरुन सोशल मीडियावर तुफान मिम्स, व्हिडीओ, ज्योक्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये तरुणीला ब्रेक दाबायचा होता मात्र तिने ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबलाय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायल होतोय. (Viral Video on instagram a girl driving scooty press accelerator instead of the brake read story)

सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलगी रस्त्याच्या कडेला स्कूटी घेऊन थांबलेली असते. अचानक ती उजव्या बाजूला वळते जिथे नालासुद्धा असतो. तिला तिचा कंट्रोल हातातून सुटतो तेव्हा ती ब्रेक दाबण्याच्या तयारीत असते मात्र चुकून ब्रेकऐवजी तिच्या हातून एक्सीलेटर दाबला जातो.

पुढे काय होतं, याची कल्पना तुम्ही केलीच असावी. मुलगी अपेक्षेप्रमाणे गाडी घेऊन नाल्यात पडते.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या वर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. gieddeee या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून मजेशीर रित्या हा व्हिडीओ एडीट केलाय.