Viral Video : लिफ्ट आहे की नरकाचं द्वार? रुग्ण स्ट्रेचरवरून थेट...! धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

रूग्णालयातील लिफ्टमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय
Viral Video
Viral Videoesakal

Viral Video: मोठमोठ्या इमारतींमध्ये वेळेची बचत आणि मानवी सोयीच्या दृष्टी लिफ्टची सुविधा दिसून येते. मात्र ही लिफ्ट एखाद्यासाठी किती प्राणघातक ठरू शकते याचा विचार तुम्ही केलाय का? रूग्णालयातील लिफ्टमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

रूग्णालयात भर्ती असलेल्या रूग्णाला स्ट्रेचरमधून लिफ्टने नेत असताना तांत्रिक बिघाडामुळे वेळेआधीच लिफ्ट खालच्या दिशेने जाऊ लागली. स्ट्रेचर पूर्णपणे लिफ्टमध्ये बसले नसल्याने हा रूग्ण थेट लिफ्टमध्ये आदळला. लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून रूग्णालयातील लिफ्टमध्ये घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Viral Video)

रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता लिफ्टमध्ये रूग्णांना नेणे योग्य की अयोग्य असाही प्रश्न लोकांना पडलाय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र या व्हिडीओने सगळीकडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com