

sugarcane laborers kids video goes viral on bal din touches millions
esakal
sugarcane laborers kids video viral : बालदिनाच्या निमित्ताने सर्वत्र मुलांच्या हसण्याचा, खेळण्याचा आणि स्वप्नांचा उत्सव साजरा झाला. हा दिवस मुलांना प्रोत्साहन देण्याचा, त्यांचे निरागस बालपण जपण्याचा आणि कल्पनाशक्तीला पंख देण्याचा असतो. पण सोशल मीडियावर सध्या एका छोट्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. "देवा, असल बालपण कुणाच्याच वाट्याला येऊ नये!" असं म्हणण्याची वेळ येते. ऊसतोड कामगारांच्या या चिमुकल्यांचं जीवन पाहून गरिबीची क्रूरता आणि संघर्षाची कहाणी डोळ्यांसमोर उभी राहते.