Viral Video: किळसवाणा प्रकार! ट्रेनमध्ये पाणी गरम करणाऱ्या गंजलेल्या रॉडने केला जातोय चहा गरम; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: किळसवाणा प्रकार! ट्रेनमध्ये पाणी गरम करणाऱ्या गंजलेल्या रॉडने केला जातोय चहा गरम;

भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त सर्वसामान्य गटातील लोकसंख्या ट्रेनने प्रवास करत असते. फार लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्याने बरेच प्रवासी ट्रेनमधले जेवण, चहा, पाणी घेत असतात. मात्र ट्रेनमधील एक धक्कादायक व्हायरल व्हिडीओ पुढे आल्यानंतर प्रवाशांना आता ट्रेनमधला चहा पिण्याआधी दहा वेळा आता विचार करावा लागणार आहे.

अलीकडेच ट्रेनमधील एक धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांपुढे आलाय. ट्रेनमध्ये गरम पाण्याच्या गंजलेल्या रॉडचा वापर चहा गरम करण्यासाठी केला जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. हा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर होताच वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. (Railway)

हैदराबाद आणि तिरुवअनंतपूरममध्ये चालणाऱ्या साबरी एक्सप्रेसचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जातेय. चहा कंटेनरच्या आत खराब गंजलेला पाणी गरम करण्याचा रॉड टाकून चहा गरम करताना व्हिडीओमध्ये दिसतेय. व्हिडीओ बघितल्यानंतर नेटकरी आता कारवाईची मागणी करताय. तसेच यानंतर ट्रेनमधील कुठल्याच वस्तू खाणार असेही अनेकांनी कमेंट करत म्हटले आहे.