Viral Video: आईच्या मदतीसाठी धावून गेला चिमुकला; त्याची समयसुचकता अन् धाडस पाहाल तर थक्क व्हालं!

हा चिमुकलचा अगदीच लहान आहे. त्याची कृती पाहून 'मूर्ती लहान, किर्ती महान' असंच म्हणावं लागेल.
Viral video
Viral video
Updated on

शिडीच्या सहाय्यानं घराच्या कुंपणाच्या दरवाजावर काहीतरी काम करत असलेल्या एका महिलेला अचानक एका बिकट प्रसंगाला समोरं जावं लागलं. पण तिच्या मदतीसाठी बाजुलाच असलेला तिचा चिमुकला धावून आला. यासाठी त्यानं जी समयसुचकता दाखवली ती पाहून तुम्हीही थक्क व्हालं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या चिमुकल्याचा धाडसाचं नक्कीच कौतुक करालं. (Viral Video timing and courage of little Boy who ran to help his mother was amazing)

Viral video
Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येमागं 'हे' आहे का कारण? वाचा काय घडलंय

फर्स्टपोस्टच्या इन्स्टाग्राम हँडलवर या घटनेचा रिल पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या सोसायटीच्या गेटच्या वरच्या बाजूला काहीतरी अडकलेली वस्तू काढण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. एका मोठ्या शिडीच्या माध्यमातून ती ही वस्ती काढताना दिसत आहे.

Viral video
Photos: तुनिषाचे काही आनंदाचे क्षण पाहा, भावूक व्हाल!

पण तिनं दोन्ही हातांनी गेटच्या वरच्या भागाला पकडलेलं असताना अचानक ती ज्या शिडीवर उभी असते ती शिडी कोसळले आणि ती महिला या गेटवर लटकून राहते. हे घडलेलं असताना तिचा चिमुकला बाजुलाच उभा होता. ज्यानं शिडी कोसळलेली पाहिली आणि आई वर लटकलेल्या अवस्थेत असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर क्षणाचाही विचार न करता तो आईच्या मदतीसाठी धावून गेला. त्यानंतर पहिल्यांदा ही भली मोठी शिडी उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

त्याच्यासाठी ही शिडी उभी करणं खरचं खूपच अवघड गोष्ट असतानाही त्यानं समयसुचकता दाखवत ती उभी करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्यानं ती व्यवस्थित उभी केली. त्यानंतर पुन्हा शिडीचा आधार मिळाल्यानं दरवाज्याला लटकलेली त्याची आई शिडीचा आधार घेत पुन्हा सुखरुप खाली येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com