
Trending Video : भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना लंडनच्या रस्त्यांवर एक थरारक घटना घडली. भारतीय तिरंगा हातात घेऊन स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करणाऱ्या भारतीय तरुणींवर काही पाकिस्तानी तरुणांनी असभ्य वर्तन केले. मात्र या तरुणींनी धाडसाने त्यांना प्रत्युत्तर देत तिरंग्याचा सन्मान राखला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.