
esakal
एका चिमुकल्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
सापांसोबतच्या कृतीने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले
तुम्हीही पाहा हा आश्चर्यकारक व्हिडिओ
Snake Video : एका लहान मुलाच्या निडर कृतीने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. घराबाहेर पडताना या चिमुकल्याला दोन साप दिसले आणि त्याने थेट त्यांना हातात पकडून खेळायला सुरुवात केली. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. ‘कलियुगपूर’ या इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट झालेल्या या व्हिडीओला ४१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.