Waterfall Video : धबधब्याच्या टोकावर सेल्फी घ्यायला गेला अन् पाण्यात पडला; खाली 300 फूट खोल दरी, पुढे जे झालं...भयानक व्हिडिओ व्हायरल

man trapped at edge of kalu waterfall rescued in viral video : धबधब्यावर एक तरुण पाण्याच्या जोरात मधोमध अडकला. या भीषण थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे
viral video tourist stuck in rising water at waterfall saved by locals
viral video tourist stuck in rising water at kalu waterfall saved by localsesakal
Updated on

थोडक्यात..

  • काळू धबधब्यावर पाण्याचा प्रवाह वाढताच एक तरुण धबधब्याच्या कडेला अडकला.

  • खाली खोल दरी असूनही स्थानिकांनी जीव धोक्यात घालून त्याचं रेस्क्यू केलं.

  • सोशल मीडियावर या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

Viral Video : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना सहलींचं वेड लागत. डोंगरदऱ्या, धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणं पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जातात. पण कधी कधी या सौंदर्याच्या नादात माणूस स्वतःच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र दिसतं. अशीच एक धडकी भरवणारी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या खिरेश्वरजवळील प्रसिद्ध काळू धबधब्यावर घडली आहे.

या ठिकाणी एक तरुण धबधब्याच्या टोकावर सेल्फी घेण्यासाठी गेला असताना अचानक पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि तो थेट धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडला. विशेष म्हणजे, त्याच्या खाली होती २०० ते ३०० फूट खोल दरी आणि काही क्षणांची चूक झाली असती तर हा तरुण वाहून गेला असता

धबधब्याच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की तरुण पुढे-पाठी काहीही हालचाल करू शकत नव्हता. हा सगळा प्रसंग स्थानिकांनी पाहिला आणि धाडस करत एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुदैवाने, वेळेवर हालचाल करत तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर ‘kiran_sabale_vlogs_official’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

viral video tourist stuck in rising water at waterfall saved by locals
Video : कुटुंब गाढ झोपलेलं अन् अचानक समोर फणा काढलेला किंग कोब्रा; बेडरूममध्ये पुढे जे झालं...,थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडीओत तरुण धबधब्याच्या अगदी टोकावर उभा आहे, त्याच्या पुढे खोल दरी आणि जोरात वाहणारं पाणी.. पाय घसरला असता, कदाचित हकनाक जीव गेला असता. रेस्क्यू केल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याला चांगलंच फटकारलं आणि पुढे अशी चूक करू नये, असं बजावलं.

साताऱ्यात याआधीही असाच प्रकार घडला होता, जेव्हा रिल्सच्या नादात एक कार थेट ३०० फूट दरीत कोसळली होती. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी स्टंटबाजी करणं किती घातक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

viral video tourist stuck in rising water at waterfall saved by locals
OYO Video : नवऱ्याने बायकोला ओयोत रंगेहाथ पकडलं; अर्धनग्न अवस्थेत तिने मारली बाल्कनीतून उडी, धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

FAQs

  1. ही घटना कुठे घडली आहे?
    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काळू धबधब्यावर ही घटना घडली आहे.

  2. तरुण कसा अडकला होता?
    सेल्फी घेण्याच्या नादात टोकावर गेला असताना पाण्याचा जोर वाढल्याने तो अडकला.

  3. त्याला वाचवण्यासाठी काय उपाय केले गेले?
    स्थानिक तरुणांनी धाडस करून एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि त्याचा जीव वाचवला.

  4. व्हिडीओ कुठे शेअर करण्यात आला आहे?
    ‘kiran_sabale_vlogs_official’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com