
Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनव्या व्हिडीओज आणि रिल्सचा भडीमार पाहायला मिळतो. लोक जास्त व्ह्यूज आणि लाइक्ससाठी अनेक गोष्टी करतात, पण काही वेळा ही मजा धोकादायक ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर एका आईच्या कृत्यामुळे संताप व्यक्त होतोय, ज्यामुळे तिच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला. व्हिडीओच्या नादात एका आईने आपल्या लहान बाळाला इमारतीच्या गच्चीच्या कडावर बसवले आणि ते पाहून इंटरनेटवर सगळ्यांचा धक्का बसला.
सामान्यतः आईच्या प्रेमाची आणि काळजीची तुलना कोणत्याही गोष्टीशी केली जात नाही. पण, जेव्हा आईचंच कृत्य आपल्या बाळासाठी धोक्याचं ठरतं, तेव्हा त्या कृत्याचे नकारात्मक परिणाम होतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या पोटच्या लेकराला इमारतीच्या गच्चीवर बसवताना दिसते. एवढ्या उंचीवर तिने आपल्या बाळाला बसवले असून, त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. बाळ जरा हललं तरी ते थेट खाली पडू शकतं.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @varsha._.yaduvanshi या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी या कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. 'आजकालच्या आया अशा कशा?', 'रिल पुन्हा बनवता येईल, पण लेकरु गेलं तर ते पुन्हा येईल का?', अशा संतापपूर्ण प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर महिलेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी काही लोक आपल्या सुरक्षिततेचा विचार न करता खतरनाक कृत्ये करत आहेत. असे कितीतरी व्हिडीओ आणि रिल्स पाहायला मिळतात ज्यात लोक आपले जीवन आणि इतरांची सुरक्षा धोक्यात टाकतात. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, आणि इतर अशा ठिकाणी लोक स्टंट करताना दिसतात, पण याच्या गंभीर परिणामांचा विचार फारच कमी होतो. असाच हा व्हिडीओ, जो एक आईच्या चुकीच्या कृतीचे उदाहरण ठरला आहे
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीसाठी किंवा व्ह्यूजसाठी आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेला धक्का लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. असं काही घडल्यास त्याचे परिणाम हृदयद्रावक ठरू शकतात. आता प्रश्न हा आहे की, एक आई आपल्या मुलाच्या सुरक्षिततेचा विचार न करता असा निर्णय का घेतो? समाजात या गोष्टींना थांबवण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.