Viral Video : वाऱ्याच्या वेगाने 12 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट 20 सेकंदात बुडाली; घटनेची थरारक दृश्ये

हे पर्यटक बोटिंग करण्यासाठी या ठिकाणी आले होते.
Viral Video
Viral VideoSakal

तलाव, धरणे, समुद्रकिनारी अनेक पर्यटक फिरायला जात असतात. तर अशा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण सध्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये १० ते १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली आहे.

Viral Video
Sinhagad Fort Pune : परत आली यशवंती घोरपडीची आठवण! सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी; Video Viral

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या समुद्रकिनाऱ्यावरील आहे याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही पण या घटनेमध्ये पर्यटकांसहित बोट बुडाल्याचं दिसत आहे. एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. तर या दुर्घटनेत बोटही पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, बोट निघाल्यानंतर सर्व पर्यटक खूश दिसत आहेत. तर एक पर्यटक मोबाईलमध्ये शूट करताना दिसत आहे. त्यानंतर समुद्राच्या मोठ्या लाटा येत असून एका मोठ्या लाटेत ही बोट बुडाली आहे. बोट निघाल्यापासून ही घटना फक्त २० सेकंदात घडली आहे. तर ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com