Video Viral : नवरीला फिल्मी स्टाईलने घेतलं होतं उचलून; पायऱ्यावरून पडला पण किस केलंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : नवरीला फिल्मी स्टाईलने घेतलं होतं उचलून; पायऱ्यावरून पडला पण किस केलंच

लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना हार घालताना अनेक प्रयोग करत असतात. गळ्यात हार घालताना त्यांना उचलून घेतलं जातं, त्यामुळे हार घालताना नवरीला परत कुणीतरी उचलून घेतं. नवरीला उचलून घेऊन फोटोग्राफीही केली जाते. असे अनेक प्रयोग लग्नाच्या कार्यक्रमात केले जातात. तर आत्ता एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नवरदेव लग्नात नवरीला उचलून घेऊन चालला असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. पायऱ्यावरून उतरताना त्याचा पाय घसरतो आणि तो पायऱ्यावरून नवरीला घेऊन पडतो. त्यानंतरही तो आपल्या बायकोला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, पडला तरी किस केल्यामुळे या नवरदेवामध्ये एवढा कॉन्फिडन्स कसा अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :weddingbrideviral video