Video Viral : बॉयफ्रेंडसोबत असलेल्या तरूणीला छेडायचा प्रयत्न केला अन् दोघेही थेट हॉस्पिटलमध्ये

या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video Viral
Video ViralSakal

आपल्या वाईट कृत्याचे फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे वाईट काम करायचे नाही असं प्रत्येकाला लहानपणापासून सांगण्यात येते. तर वाईट काम केल्यानंतरही आपल्याला त्याचे वाईट फळ मिळणार असं अनेकांच्या मनात असतं. त्यामुळे वाईट कामापासून दूर राहायला पाहिजे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण एका भुयारी मार्गावर थांबलेले दिसत आहेत. तर तिथूनच एक जोडपे जात असताना त्या दोन तरूणातील एक तरूण तरूणीची छेड काढताना दिसत आहे.

पाठीमागून तरूणीच्या अंगावर काहीतरी वस्तू फेकल्यानंतर तिच्यासोबतत असलेल्या तरूणाला राग येतो आणि तो या तरूणांकडे येऊन चांगलाच धडा शिकवतो. दोन दोन फटक्यामध्ये ते दोघेही खाली पडतात आणि त्यातील एक तर थेट बेशुद्ध पडतो.

Video Viral
Shocking Video : 'मृत्यू फक्त 5 सेंटीमीटरवरून गेला...'; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून छेड काढणाऱ्या तरूणांना आपल्या कृत्याचं फळ मिळाल्याचं यातून आपल्याला दिसेल. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com