Video Viral : जंगलात थिरकला 'चंद्रा'चा नाद; या तरूणाचे हावभाव एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video Viral : जंगलात थिरकला 'चंद्रा'चा नाद; या तरूणाचे हावभाव एकदा पाहाच

चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा या गाण्याने अनेकांना वेड लावले आहे. मुलींसहित अनेक तरूणही या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दहिहंडी, नवरात्र आणि गणेशोत्सवात या गाण्याचा बोलबाला होता. तर या गाण्यावर डान्स करणारे अनेक तरूणांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असाच एका तरूणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Young Boy Chandra dance Video Viral)

हा व्हिडिओ जंगलातली असून काही मुलांची टीम फिरायला गेल्याचं या व्हिडिओतून समजतंय. फिरायला गेले असता जंगलात मध्येच गाडी थांबवून या तरूणाने चंद्रा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर केला जात असून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस यावर पडला आहे.

दहिहंडीच्या कार्यक्रमात आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात चक्क तरूणांनी मुलींनाही लाजवेल असा डान्स प्रचंड व्हायरल होत होता. त्यानंतर आता हा जंगलातील चंद्रा डान्स व्हायरल होत आहे. स्टार मराठी या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

टॅग्स :danceviral video