Viral Video : धक्कादायक! जीव धोक्यात घालून अजगर पकडलं पण वर काढतानाच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : धक्कादायक! जीव धोक्यात घालून अजगर पकडलं पण वर काढतानाच...

अजगर किंवा साप बघितला की आपली पळता भुई थोडी होते. तर काही लोकं सापाला पाहून एवढे घाबरतात की त्यांना आधार द्यायला कुणीतरी जवळ असायला लागतं. पण साप पकडणारे किती जिगबाज असतील? सध्या एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपला जीव धोक्यात घालून हा तरूण अजगराला पकडत आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

एक तरूण एका पुलावर चढून पाण्यातील अजगराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. एका हाताने पुलाला धरून दुसरा हात पाण्यामध्ये घालून हा तरूण अडकलेल्या अजगराला पकडत आहे. तर या अजगराची जाडी पाहून आपल्याही अंगावर शहारे येतील. अजगराला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला वर घेण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या मित्राला सांगतो.

हेही वाचा: Viral Video : बेडूक आहे की मुलगी! हिने तर गटकन् माशीच गिळली

दरम्यान, दुसरा मित्र अजगराला हातात घेण्याची मनाई करतो आणि त्याच्या शेपटीला दोरी बांधतो. त्यानंतर सदर व्यक्ती अजगराला वर फेकतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या जिगरबाज तरूणाला नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहे. तर या व्हिडिओ वर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :pythonviral video