Application for Boyfriend : "आयुष्यभर सिंगल आहे..." बॉयफ्रेंडच्या तपासात तरूणीने काढली जाहिरात; एका दिवसांत आले 3 हजार अर्ज

Application for Boyfriend
Application for BoyfriendSakal

नोकरीच्या संदर्भातील अनेक जाहिराती आपण पाहिल्या असतील पण एका तरूणीने चक्क बॉयफ्रेंडसाठी जाहिरात काढल्याचं आपण पहिल्यांदाच ऐकत असाल. पण एका तरूणीने अशा प्रकारची जाहिरात काढली असून हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बॉयफ्रेंड हवा असल्याची जाहिरात काढल्याचं वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. टीकटॉकवरील @itsveradijkmans या अकाऊंटवरून अर्जाचा नमुना सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने अनेक अटी घातल्या आहेत.

वेरा असं या तरूणीचं नाव असून तिने ही जाहिरात काढली आहे. त्यामध्ये मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहतो का? मुलाकडे स्वत:ची कार आहे का? असे प्रश्नही विचारले आहेत. "अनेक लोकांना मी प्रेम मिळण्यासाठी जाहिरात काढली आहे हे विचित्र वाटत असेल पण अनेक तरूणांकडून मला साकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मी पूर्ण आयुष्य सिंगल राहिली आहे. म्हणून मी आता एका प्रियकरासाठी तयार आहे. मी संसारासाठी तयार आहे" असंही ती म्हणाली.

Application for Boyfriend
Song Viral : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'; सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेलं गाणं ऐकलंय का?

जाहिरात काढल्यानंतर वेरा हिला एका दिवसांत तब्बल ३ हजार तरूणांचे अर्ज आले. तिच्या वैयक्तिक फोन क्रमांकावर मेसेज करूनही काही तरूणांनी अर्ज पाठवले आहेत.

काय आहेत या तरूणीच्या अटी

"तरूण मजा मस्ती करणारा हवा आहे. त्याला संगीत आवडलं पाहिजे, त्याला संगिताची चांगली जाण असायला हवी, तो कमावता असला पाहिजे, तो इमानदार असला पाहिजे, तो कार्टून बघणारा पाहिजे" अशा अटी वेरा या तरूणीने घातल्या आहेत. तर अर्ज करणाऱ्या अनेक तरूणांनी त्यांच्यासुद्धा अटी या अर्जामध्ये दिल्या आहेत. तर काही प्रतिप्रश्नसुद्धा वेरा हिला विचारले आहेत.

Application
ApplicationSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com