esakal | तर मी आत्महत्या करणार; धनंजय मुंडेना धमकीचे ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay munde Tweet News Marathi

कार्यकर्त्यांने त्यांच्या ट्विटला उत्तर देताना तुम्ही पक्षाची आणि शरद पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.

तर मी आत्महत्या करणार; धनंजय मुंडेना धमकीचे ट्विट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीविरुद्ध बंड केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या या बंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही समावेश होता असा अंदाज काहींकडून लावण्यात आला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अनेकांकडून टीका झाली. धनजंय मुंडे यांनी ट्विट करत सांगितलं की, मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत आहे. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती. त्यानंतर एका कार्यकर्त्यांने त्यांच्या ट्विटला उत्तर देताना तुम्ही पक्षाची आणि शरद पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या कार्यकर्त्याने धनंजय मुंडे यांच्या ट्विटला रिप्लाय करताना म्हटले आहे की, साहेब मी स्वतः काल तुम्हाला 7-8 कॉल केले. तुमचा फोन नॉट रिचेबल लागत होता. तुमचा फोन न लागल्याने किती टेन्शन घेतलं मी काल पासून हे फक्त माझ्या घरच्यांना माहीत आहे. तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन कारण उत्तर तुम्हाला नाही तर कार्यकर्त्यांना द्यावे लागतं असं या ट्विट मध्ये या कार्यकर्त्यांने म्हटले आहे. सिद्धेश निकम पाटील असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील

राज्यातील सत्तानाट्य काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसताना दोन दिवसांपूर्वी या सत्तासंघर्षाला अनेपेक्षित कलाटणी मिळाली होती. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे, हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांना जाहीर पाठिंबा देत आपली बाजू स्पष्ट केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याभोवती सशंयाचे जाळे निर्माण करण्यात येत होते. 

व्हीप म्हणजे नेमके काय?

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती. अशा आशयाचे ट्विट केले होते. याप्रमाणेच अनेक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत कायम राहण्याची विनंती केली आहे.