esakal | गृह विलगीकरणातील रुग्णाची अशी घ्या काळजी!
sakal

बोलून बातमी शोधा

Home

गृह विलगीकरणातील रुग्णाची अशी घ्या काळजी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डबल म्युटंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत आहे. लक्षणे न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा वेळी आवश्यक उपाययोजना आणि खबरदारीचा घेतलेला हा आढावा.

गृह विलगीकरणामध्ये रुग्णांना सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. या आजाराची नवनवी लक्षणे समोर येत आहेत. काही रुग्ण असेही आढळून येत आहेत, ज्यांच्यात या रोगाची कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत. रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला विलगीकरणात पाठवावे व त्याच्या सर्व कुटुंबीयांनीही क्वारंटाईन होणे आवश्यक आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रतीक्षा!

ठिकाण असे असावे

 • जिथे चांगली हवा खेळते, अशी खोली हवी.

 • खोलीच्या खिडक्या व दरवाजे उघडे ठेवा.

 • घरातील रुग्णाचे येणे-जाणे व वावर कमी करा.

 • स्वयंपाकघर व स्वच्छतागृह अशा सर्वांनी वापरायच्या जागी रुग्णाचे येणे-जाणे बंद करा.

निर्जंतुकीकरणासंबंधी

 • हात पुसण्यासाठी नेहमीच्या टॉवेलऐवजी डिस्पोजेबल कागदी टॉवेल वापरा.

 • ग्लोव्ह्‌ज व मास्क घालताना वा काढताना हात साबणाने स्वच्छ धुवा.

 • घरच्या सर्वांनी मास्क वापरा, जेणेकरून त्यांचे तोंड व नाक झाकलेले राहील.

 • रुग्णाची खोली व वापरण्याचा रस्ता व्यवस्थित सॅनिटाईज करा, या जागा रोज स्वच्छ करा.

 • रुग्णाने वापरलेले टॉयलेट, बाथरूम आठवड्यातून एकदा व्यवस्थित साफ करा.

 • रुग्णाचे कपडे, चपला व खाण्याची भांडी वेगळी ठेवा. वापरल्यानंतर हे सर्व व्यवस्थित साफ करा.

हेही वाचा: पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर

उत्तम रोगप्रतिकारशक्ती असल्यास घ्या जबाबदारी

 • अनेक लोकांना रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी देऊ नका.

 • उत्तम तब्येत व रोगप्रतिकारशक्ती असलेल्या एकाच व्यक्तीला हे काम द्या.

 • रुग्णाशी कुठल्याही प्रकारचा शारीरिक संपर्क आल्यास व्यवस्थित सॅनिटायझेशन करा.

 • हात साबणाने स्वच्छ धुवा.

 • डॉक्टरांच्या संपर्कात सातत्याने राहा.

हे टाळा

 • रुग्णाजवळ असताना आपल्या मास्कला स्पर्श करणे. शरीराचा कोणताही भाग उघडा ठेवणे.

 • एकच मास्क व ग्लोव्ह्‌ज दुसऱ्यांदा वापरणे.

 • आपल्या हातांनी चेहरा, नाक, तोंडाला स्पर्श करने.

 • रुग्णाला भेटल्यानंतर लगेच इतरांना भेटणे.