esakal | अजित पवारांसोबत असलेल्या दोन आमदारांचे व्हिडिओ प्रसिद्ध, 'ते' म्हणतात
sakal

बोलून बातमी शोधा

Videos of two MLA of NCP who was with Ajit Pawar are Viral on Social Media.jpg

लातुर जिल्ह्यातील अहमदपुर मतदार संघातील आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील, आणि ठाणे जिल्ह्यातील शहापुर विधासभा मतदार संघातील आमदार दौलत दरोडा यांचे व्हिडिओ समोर आले आहेत.  

अजित पवारांसोबत असलेल्या दोन आमदारांचे व्हिडिओ प्रसिद्ध, 'ते' म्हणतात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे काही आमदार त्यांच्यासोबत होते.11 आमदारांपैकी 7 आमदार काल परतले होते. कालपासून बेपत्ता असलेल्या चार आमदारांपैकी दोन आमदारांचे व्हिडिओ समोर आले आहेत.

भाजपला मी व्यापारी समजत होतो पण..., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत

लातुर जिल्ह्यातील अहमदपुर मतदार संघातील आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील, आणि ठाणे जिल्ह्यातील शहापुर विधासभा मतदार संघातील आमदार दौलत दरोडा यांचे  व्हिडिओ समोर आले आहेत.  

फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी

आमदार बाबासाहेब पाटील यांनी या व्हिडिओतून, ''आम्ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहेत. आम्ही शरद पवारचे समर्थक आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत. आम्ही राष्ट्रवादीसोबतच राहणार आहोत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.'' असे सांगुन आपली भूमिका स्पष्ट केली.

'सुप्रियाताईंच अभिनंदन, त्याच शरद पवारांच्या खऱ्या वारसदार' 

आमदार दौलत दरोडा यांनी, ''मी सुरक्षित आहे. घड्याळाच्या चिन्हावर मी निवडून आलो असून पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार आणि शरद पवार जो निर्णय घेतील त्याला बांधील आहे.'' असे सांगुन, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती त्यांनी या व्हिडिओतून कार्यकर्त्यांना केली आहे.
 

महाराष्ट्रातील सत्ता पेचावर, सुप्रीम कोर्टात असा झाला युक्तीवाद; वाचा सविस्तर