Budget 2021: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटविषयी 10 रंजक गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 18 January 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील.

नवी दिल्ली- बजेट सरकारचे एक वार्षिक आर्थिक विवरण पत्र असते, यात राजस्व, वृद्धी, घट यांच्या अनुमानांसोबत राजकोषीय स्थितीचे विवरण असते. सर्वसाधारण बजेटमध्ये सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब असतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बजेटसंबंधी 10 फॅक्ट जाणून घेऊया... 

बजेटसंबंधी 10 रंजक गोष्टी

1. स्वतंत्र भारताचे पहिले बजेट अर्थमंत्री आर के षणमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला मांडला होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले बजेट 28 फेब्रुवारी 1950 साली जॉन मथाई यांनी सादर केला होता.

शेअर बाजार किती स्वस्त, किती महाग?

2. आर्थिक प्रकरणाची वेबसाईट  dea.gov.in वर उपलब्ध आकडेवारीनुसार, स्वतंत्र भारताचा पहिला बजेट 15 ऑगस्ट 1947 पासून 31 मार्च 1948 या साडेसात महिन्यांच्या कालावधीसाठी होता. 

3. चेट्टी यांनी 1948-49 च्या बजेटमध्ये पहिल्यांदा अंतरिम (Interim) शब्दाचा वापर केला होता. त्यानंतरपासून छोट्या कालावधीच्या बजेटसाठी अंतरिम या शब्दाचा वापर केला जाऊ लागला. 

4. भारतात 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत चालणाऱ्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1867 मध्ये झाली होती. याआधी 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत आर्थिक वर्ष होते.  

5. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये सर्वसाधारण बजेट सादर केला होता. त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. सोबतच अर्थ मंत्रालयाचा भारही त्यांच्यावर होता. 

6. स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटमध्ये राजस्व 171.15 कोटी रुपये निर्धारित करण्यात आला होता. 

LIC तील गुंतवणुकीनंतर लगेचच मिळेल प्रतिमाह 6 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे...

7. 2000 पर्यंत इंग्रजांच्या परंपरेनुसार बजेट 5 वाजता सादर केला जायचा. 2001 मध्ये अटलबिहारी वाजपायीच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने ही पंरपरा मोडली. आता सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करण्याची परंपरा सुरु झाली. 

8. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत सर्वाधिक 10 वेळा बजेट सादर केला आहे. 

9. 2017 पर्यंत बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सादर केला जायचा. 2017 पासून तो 1 फेब्रुवारीपासून सादर केला जाऊ लागला. 

10. सुरुवातीला रेल्वे बजेट आणि यूनियन बजेट वेग-वेगळे सादर केले जायचे. 2017 पासून मोदी सरकारने रेल्वे बजेट आणि सर्वसाधरण बजेट एकत्र सादर करण्याचा प्रयोग केला. 2017 पासून दोन्ही बजेट एकत्र सादर करण्याची परंपरा सुरु झाली.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2021 know about first budget of independent india