Budget 2023 : वार्षिक उत्पन्न 5 ते 15 लाख रुपये असेल, तर जाणून घ्या आता किती कर भरावा लागेल

नवीन आयकर व्यवस्था आकर्षक बनवण्यासाठी कर स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
Budget 2023
Budget 2023Sakal

Income Tax Slab 2023 New Announcements 2023 : देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

आयकराबाबत देशभरातील नोकरदारांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून अर्थमंत्र्यांनी आयकराबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. वैयक्तिक आयकरामध्ये 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

सर्वप्रथम, अर्थमंत्री म्हणाल्या की, नवीन कर प्रणालीमध्ये 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, परंतु आता ही सवलत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर मिळणार आहे. म्हणजेच, नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाखांच्या सूट मर्यादेपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.

नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनवण्यात आली आहे. 2020 मध्ये लागू करण्यात आलेले 6 आयकर स्लॅब बदलून 5 करण्यात आले. आयकर मूळ सूट 3 लाख रुपये असेल. आता नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे.

Budget 2023
Budget 2023 : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरावर होणार परिणाम!

कर सवलती बाबतीत महत्वाचे मुद्दे -

1. जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये, ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे ते कोणत्याही प्रकारचा कर भरत नाहीत.

परंतु नवीन कर प्रणालीमध्ये सवलतीची मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही.

2. मध्यमवर्गासाठी 2020 मध्ये एक नवीन कर व्यवस्था आणली गेली, ज्यात 6 कर स्लॅब होते, ते 5 वर आणले जात आहेत आणि कर सूट मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाख करण्यात आली आहे.

3. पगारदार करदाते आणि पेन्शनधारकांसाठी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली आहे, परंतु ती 15.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर लागू होईल. एवढ्या उत्पन्नावर रु.52,500 चा नफा मिळेल. यापेक्षा कमी उत्पन्नावर स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा फक्त 50,000 राहील.

4. नवीन कर प्रणाली ही डीफॉल्ट कर प्रणाली असेल, परंतु तुमच्याकडे जुन्या कर प्रणालीचा पर्याय असेल.

Budget 2023
Health Budget 2023 : आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा, 2047 पर्यंत 'या' आजारांपासून मिळणार मुक्ती

5. रजा रोखीकरणाची (Leave Encashment) घोषणा करण्यात आली आहे. आता पगारदार कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतरची रजा रोखण्यासाठी सूट मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ही सूट 3 लाखांपर्यंतच्या मर्यादेवर उपलब्ध होती.

6. देशातील कमाल कर दर 42.74% आहे, जो नवीन कर प्रणालीमध्ये 37% वरून 25% पर्यंत कमी करण्यात आला आहे. आता कमाल कर दर 39% पर्यंत कमी केला जाईल.

10 लाखांच्या उत्पन्नावर किती कर!

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 10 लाख रुपये असेल, तर नवीन कर प्रणालीच्या जुन्या कर स्लॅबनुसार, त्याला 75,000 रुपये आयकर भरावा लागतो.

परंतु नवीन कर प्रणालीमध्ये कर स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे, 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 60,000 रुपयांचा आयकर भरावा लागेल, म्हणजे 15,000 रुपयांची वार्षिक बचत.

आता 15 लाखांच्या उत्पन्नावर किती कर!

समजा एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असेल, तर नवीन कर प्रणालीच्या जुन्या स्लॅबनुसार, त्या करदात्याला 1,87,500 रुपये आयकर भरावा लागेल.

पण आता अशा करदात्यांना 1,50,000 रुपये कर भरावा लागेल म्हणजेच 37500 रुपयांचा आयकर वाचणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com