

Healthcare Union Budget 2026 Highlights
sakal
Cancer medicine price cut India: आज भारताचे युनियन बजेट सादर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मळ सीतारामन यांनी यावर्षी सलग नवव्यांदा भारताचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष महत्त्व दिले आहे.
यामध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. डायबिटीज, कॅन्सरसारख्या गंभीर आणि दीर्घकालीन आजारावरील औषधांपासून ते संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणापर्यंत आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.