

MSME Budget 2026
esakal
अमेरिकेच्या दादागिरीला भीक न घालता भारताने युरोपात व्यापार वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय बाजारपेठेचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या एमएसएमई क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. १० हजार कोटी रुपयांच्या घोषणेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. युरोपीय संघासोबत झालेल्या मुक्त व्यापार कराराचा स्पष्ट प्रभाव या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. त्यामुळे युरोपीय बाजारपेठेत जर भारताची स्थिती मजबूत झाली तर अमेरिकेवर भारताला अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही