
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर होण्यासाठी आणखी काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा १४वा अर्थसंकल्प देशासमोर सादर करणार आहेत. पण, देशात अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजताच ठेवण्याचा निर्णय कधी घेण्यात आला होता, हे तुम्हाला माहीत आहे का? हे नेहमीच घडले आहे का? तर याची वेळ आधी वेगळी होती. मात्र नंतर ती अर्थमंत्र्यांकडून बदलण्यात आली.