Budget 2022 : अर्थमंत्र्यांच्या टीममध्ये ‘या’ दिग्गजांकडे असतील सर्वांच्या नजरा!

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे.
budget
budgetsakal

Union Budget 2022 Team : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2022) 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून नवी वाट मिळेल अशी आशा सर्वांना आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी देशातील अनेक दिग्गज अर्थमंत्र्यांसोबत काम करत असून, यामध्ये टीव्ही सोमनाथन, तरुण बजाज, अजय सेठ आणि तुहीन कांत पांडे यांसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. 2022 च्या बजेट टीममध्ये समाविष्ट असलेल्या या दिग्गजांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

budget
आरोग्यक्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी भरभक्कम तरतूद?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यंदा चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशव्यापी लॉकडाऊन आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर यावेळचा अर्थसंकल्प खूप खास असा आहे. मागील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प देखील कोरोनाच्या छायेखाली सादर करण्यात आला होता आणि आता कोविड 19 चे नवीन रूप पाहता यावेळचा अर्थसंकल्प देखील अधिक महत्त्वाचा बनला आहे. यावेळचा अर्थसंकल्प काही विशेष असेल असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.

टीव्ही सोमनाथन

वित्त मंत्रालयात एक्सपेंडिचर सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळणारे टीव्ही सोमनाथन (TV Somanathan) हे या बजेट टीममधील प्रमुख चेहरा आहेत. खरे तर, अर्थ मंत्रालयाच्या पाच सचिवांपैकी ज्येष्ठांची वित्त सचिव म्हणून नियुक्ती केली जाते. सध्या टीव्ही सोमनाथन ही मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्या हातात आहे. सोमनाथन हे तमिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. टीव्ही सोमनाथन यांनी जागतिक बँकेतही काम केले आहे. कोलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले टीव्ही सोमनाथन यांच्यासमोर बजेट खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

देबाशिष पांडा

बजेट टीमचा एक भाग असलेले दोबाशिष पांडा (Debasish Panda), वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत. अर्थसंकल्पातील आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व लहान-मोठ्या घोषणांची जबाबदारी पांडा यांच्याकडे असते आणि त्यामुळे ते टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग मानले जात आहेत. पांडा, 1987 च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी असून, त्यांना वित्तीय व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सोबत काम करण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

budget
रिअल इस्टेट क्षेत्राला हव्या आहेत सवलती

अजय सेठ

बजेट टीम 2022 मधील सदस्य अजय सेठ (Ajay seth), हे देखील त्यांच्या क्षेत्रात मास्टर आहेत. अर्थ मंत्रालयातील सर्वात नवीन सदस्य असूनही, सर्वांच्या नजरा अजय सेठ यांच्यावर असणार आहेत. अजय हे 1987 च्या बॅचचे कर्नाटक कॅडरचे IAS अधिकारी आहेत. या अर्थसंकल्पात भारताची जीडीपी वाढ टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतील खाजगी भांडवली खर्चाला पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान आणि जबाबदारी सेठ यांच्यासमोर असणार आहे.

तरूण बजाज

तरूण बजाज (Tarun Bajaj), 1988 च्या हरियाणा बॅचचे IAS अधिकारी असून, ते वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत. अर्थमंत्रालयात येण्यापूर्वी बजाज यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. त्यांनी देशासाठी जाहीर करण्यात आलेल्या अनेक मदत पॅकेजवर भरीव काम केले आहे. तीन आत्मनिर्भर भारत पॅकेजला आकार देण्यात तरुण बजाज यांची भूमिका महत्त्वाची होती.

तुहिन कांत पांडे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेट 2022 च्या टीममध्ये तुहिन कांत पांडे (Tuhin Kant Pandey) देखील आहेत. पांडे यांच्या खात्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. तुहिन कांत, 1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे IAS अधिकारी असून, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. पांडे यांची ऑक्टोबर 2019 मध्ये DIPAM चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कृष्णमूर्ती सुब्रमण्यन

बजेट 2022 च्या टीममध्ये असलेले कृष्णमूर्ती सुब्रमण्यन (Krishnamurthy Subramanian) यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. प्रोफेसर लुगी जिंगल्स आणि रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस विद्यापीठात पीएचडी केली आहे. सुब्रमण्यन यांना डिसेंबर 2018 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आले होते. एवढेच नाही तर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणातही त्यांना मास्टर मानले जाते. त्यामुळे जागतिक महामारीमुळे गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेच्या काळात संपूर्ण देशवासियांच्या नजरा कृष्णमूर्ती यांच्याकडे लागून राहिल्या आहेत. (Budget Team 2022)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com