
Gold Price Budget 2025 Updates: आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्यात सोने पाच हजार रुपयांनी महागले होते. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 77,460 रुपये आहे. काल 77,450 रुपये भाव होता. त्याच वेळी, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.