Union Budget Updates
PM Narendra Modi : नेहरुंच्या काळात १२ लाख उत्पन्न असतं तर....; PM मोदींची काँग्रेसवर टीका
PM Narendra Modi On Former PM Nehru : माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत तत्कालीन सरकारने जनतेकडून मोठ्या प्रमाणावर आयकर वसूल केल्याचं पीएम मोदींनी म्हटलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शनिवारी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत करमुक्त घोषणा केली. या घोषणेनंतर करावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत तत्कालीन सरकारने जनतेकडून मोठ्या प्रमाणावर आयकर वसूल केल्याचं म्हटलं.

