
यंदाचा अर्थसंकल्प देशासाठी 'बूस्टर डोस' ठरेल - भागवत कराड
औरंगाबाद : यंदाचा अर्थसंकल्प उद्या म्हणजे मंगळवारी (ता.एक) मांडला जाणार आहे. आज सोमवारी (ता.३१) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Covind) यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. उद्या मांडले जाणाऱ्या अर्थसंकल्पाविषयी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी आशावाद व्यक्त केला आहे. कराड म्हणतात, कोरोना संकटातून अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरली आहे. त्यामुळे पुढील वर्ष हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. देशाच्या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget) नक्कीच 'बूस्टर डोस' ठरेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरांना ट्विटरवर टॅग करुन कराड यांनी व्यक्त केला आहे.(This Year Budget Could Booster Dose For Financial Development Of Nation, Said Bhagwat Karad)
हेही वाचा: २०१६ पासून देशात 60 हजार नवे स्टार्टअप; 6 लाख रोजगार-राष्ट्रपती कोविंद
कराड यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना प्रा.डी.आर.नाईकपुरिया म्हणतात, की संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन योग्य चालावे. चांगली चर्चा आणि सुधारणा व्हावी. सर्वसामान्यांना अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कोरोना काळात गरिबी आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. दुसरीकडे श्रीमंत हे अधिकाधिक श्रीमंत तर गरीब हा आणखीन गरीब होत चालला आहे.
Web Title: This Year Budget Could Booster Dose For Financial Development Of Nation Said Bhagwat Karad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..