
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणताही फायदा होणार नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी विरोधकांवर यावरून निशाणा साधला.
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावरून टीकाही केली. अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणताही फायदा होणार नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी विरोधकांवर यावरून निशाणा साधला.
स्वामी रामदेव म्हणाले की, जर एखादा नेता असा परिस्थितीत चांगलं बजेट तयार करून दाखवणार असेल तर त्याला जिंकून देण्यासाठी मी माझं सर्वस्व देण्यास तयार आहे. अर्थसंकल्पावरून रामदेव बाबांनी म्हटलं की, सरकार निती तयार करू शकते. जर शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर डेअरी उद्योग वाढवावा लागेल. अशा परिस्थितीत डेअरी उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यासाठी जे हवं ते सरकारने दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरी दोन चार गाई, म्हैशी, बकऱ्या पाळता येतील.
हे वाचा - Budget 2021: शेअर मार्केटमध्ये उसळी; बजेटच्या भाषणाचा यांना झाला 'छप्पर तोड' फायदा
हे वाचा - Budget 2021: मोदी सरकारनं कोणत्या मंत्रालयाला दिलं झुकतं माप?
खाद्य तेलांबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, आम्ही जवळपास दोन लाख कोटी रुपयांचे खाद्य तेल आयात करतो. जर ते आपल्याच देशात तयार झालं तर पाच वर्षांच्या आत कमीत कमी 12 ते 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. अशा परिस्थितीत सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांबाबत पूर्ण प्लॅनिंग आहे. यासाठी सरकारसोबतच शेतकऱ्यांनासुद्धा काम करावं लागेल.