Budget 2021: मोदी सरकारनं कोणत्या मंत्रालयाला दिलं झुकतं माप?

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्याचा आरोपही विऱोधकांकडून होत आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी घोषणा करण्यात आली. कोरोना व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, आम्ही याआधी 2020 मध्येच 35 हजार 400 कोटी रुपये कोरोना व्हॅक्सिनसाठी दिले आहेत. आता आणखी गरज पडल्यास दिले जातील. यावेळी रकमेत जवळपास 137 टक्के वाढ केल्याचंही त्यांनी सांगितलं. 

वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्याचा आरोपही विऱोधकांकडून होत आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य मंत्रालयाला सर्वाधिक तरतूद केली आहे. यानंतर संरक्षण मंत्रालायसाठी 4 लाख कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केलीय. 

हे वाचा - Budget 2021: 'जनताविरोधी' बजेटनं सगळी क्षेत्रं विकून टाकली; ममता कडाडल्या

- आरोग्य आणि कल्याण मंत्रालय - 22 लाख 3 हजार 800 कोटी
कोविड व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद 
कोरोना लस मोफत करण्याची घोषणा नाहीच
वायू प्रदूषणाचे आव्हान मोडून काढण्यासाठी 2 हजार 217 कोटी रुपये
शहरी स्वच्छ भारत अभियानासाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद

- संरक्षण मंत्रालयाला 4 लाख 78 हजार 195 कोटी

- गृहमंत्रालयाला 1.66 लाख कोटी रुपयांची तरतूद

- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला 1 लाख 18 हजार 101 कोटी

हे वाचा - Budget 2021: कुणाला दिलासा, कुणाला निराशा; बजेटसंबंधी 10 महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

- रेल्वे मंत्रालय - 1 लाख 10 हजार कोटी
रेल्वे होणार हायटेक
2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर
रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींची विक्रमी तरतूद

- गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाला 54 हजार कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 updates how much money is allocated to ministry