
ही आकडेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जनमत वाढल्याचे निकालातून दिसून आले. मात्र अर्थव्यवस्थेतील ताळमेळ राखण्यात सरकार सक्षम दिसत नाही, असे आयएएनएस-सीव्हीटर बजेट ट्रॅक सर्व्हेनुसार, समोर येत आहे. सत्तेत आल्यापासून 2020 पर्यंत मोदी सरकारचा कारभार अपेक्षेपेक्षा वाईट असल्याचे मत 46.4 टक्के लोकांनी व्यक्त केले. कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली म्हणणाऱ्यांची टक्केवारी ही 31.7 इतकीच आहे. ही आकडेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारी आहे.
निवडणूक पथ्यावर; बंगाल,तामिळनाडू,आसाम,मजा आहे तुमची! 2.27 लाख कोटींची खैरात
2013 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला (UPA) अर्थिक गणित हाताळण्यात सरकार अयपशी ठरल्याचे मत 60 टक्के लोकांनी व्यक्त केले होते. मोदी सरकारच्या काळात अरुण जेटली अर्थमंत्री असताना मोदी सरकारला सर्वात चांगले रेटिंग मिळाले होते. 2017 मध्ये 52.6 टक्के लोकांनी सरकारची अर्थिक कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले होते. हे मोदी सरकारचे सर्वोच्च रेटिंग ठरले. मोदी सरकार ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी 2014 मध्ये 29.4 इतके रेटिंग होते. 2019 मध्ये त्यात थोडी वाढ झाली. रेटिंग 39.6 टक्क्यांपर्यंत पोहचले.
Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर
सरकारच्या आर्थिक कामगिरीसंदर्भात घेण्यात आलेल्या सर्व्हेत 4000 पेक्षा अधिक लोकांची मते घेण्यात आली होती. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात हा सर्व्हे घेण्यात आला होता. यातून मोदी सरकारच्या आर्थिक कारभारावर लोक असमाधानी असल्याचे दिसून येते. अर्थसंकल्पातील नव्या घोषणांची पूर्तता करुन ही आकडेवारी सुधारण्याचे मोठे चॅलेंज मोदी सरकारसमोर असणार आहे.