Budget 2021: इन्कम टॅक्स पेअर्संना दिलासा मिळणार का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 30 January 2021

1 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे

नवी दिल्ली- 1 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 चे बजेट सादर करतील. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या या बजेटमध्ये इन्कम टॅक्स पेअर्सना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एका हिंदी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार सरकार नव्या आणि जून्या अशा दोन्ही रिजिममध्ये बदल करण्याची शक्यता आहे. 

कुठे पाहता येईल बजेटचं थेट प्रक्षेपण? कसं असणार आहे Union Budget 2021?

मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सपेअर्संना 50,000-80,000 रुपयांपर्यंत दिलासा शक्य आहे. बजेटमध्ये जुन्या आणि नव्या अशा दोन्ही रिजिमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये नव्या रिजिमला आकर्षक करण्यासाठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच मोठी सूट देण्यासाठी रिजीम स्लॅबमध्ये बदल केला जाऊ शकतो. 

जुन्या स्लॅबमध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ केली जाऊ शकते. सध्या स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपये आहे. तसेच या बजेटमध्ये होमलोनवरही मोठी टॅक्स सूट देण्यावर विचार केले जाण्याची शक्यता आहे. बजेटच्या तयारीदरम्यान या प्रस्तावांवर गंभीरपणे चर्चा झाली असल्याची माहिती आहे. 

फेब्रुवारीमध्ये होणार 5 मोठे बदल; वाचा सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम?

नव्या टॅक्स व्यवस्थेनुसारही डोनेशन देणाऱ्यांना Deductions चा फायदा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशहित आणि सामाजिक कारणांसाठी डोनेशन देण्यास चालना मिळावी यासाठी सरकार बजेटमध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागील वर्षी बजेटमध्ये टॅक्सपेअर्संसाठी नव्या स्लॅबची घोषणा करण्यात आली होती, पण या सिस्टममध्ये 80G सह अनेकतर डिडक्शन संपवण्यात आले होते. सध्या सेक्शल 80-सी अंतर्गत टॅक्स पेअर्संना वैयक्तिक टॅक्समध्ये 1.50 लाखांपर्यंतची सूट दिली जाते, ती वाढवून 2 लाख रुपये करण्यात येण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union Budget 2021 income tax nirlama sitaraman 1 February