Union Budget 2021: देश विकणारा भाजपाई निश्चय; तेजस्वी यादव यांचा घणाघात

टीम ई-सकाळ
Monday, 1 February 2021

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३४.८ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

Union Budget 2021: पटना : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर बिहारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. कोरोना व्हायरसच्या साथीनंतर आलेल्या या पहिल्या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वागत केले, तर विरोधी पक्षांनी या बजेटवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी 2021 च्या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. देश विकायला काढणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया यादव यांनी दिली आहे. 

Union Budget 2021: ' केंद्र सरकारने देश विकायला काढलाय'; अधिररंजन यांची टीका​

यादव पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प नव्हता, तर सरकारी कंपन्या आणि मालमत्ता विक्रीसाठीचा सेल होता. रेल्वे, रेल्वे स्टेशन, विमानतळ, लाल किल्ला, बीएसएनएल, एलआयसी विकल्यानंतर आता बँका, बंदरे, वीज, राष्ट्रीय रस्ते, स्टेडियम, तेल पाइपलाइन आणि गोदाम विक्री करण्याचा भाजपाई निर्णय आहे.

याशिवाय या अर्थसंकल्पातून बिहारमधील उद्योगांना कोणत्याही प्रकराचे प्रोत्साहन मिळालेले नाही. लालू प्रसाद यादव यांनी बिहारला तीन-चार रेल्वे कारखाने दिले होते. आज काय मिळाले बिहारला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहारमधील ३९ खासदार फक्त टाळ्या वाजवण्यासाठी तेथे गेले होते, अशी सडकून टिकाही त्यांनी केली. या अर्थसंकल्पामुळे सामान्य नागरिक आणि देशातील जनता निराश झाली आहे. फक्त ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. 

Budget 2021: 'प्रो अॅक्टिव्ह बजेट'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया​

सीएम नितीशकुमार यांनी केलं स्वागत
२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३४.८ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. १५व्या वित्त आयोगानुसार ४१ टक्के निधी राज्य सरकारांकडे देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत १ कोटी कुटुंबांना एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे. तसेच १०० शहरे गॅस पाइपलाइनशी जोडण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. तर ७५ वर्षांवरील पेन्शनधारकांना आयकर विवरणपत्र सादर करण्यापासून मुक्त करण्याच्या निर्णयाचेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वागत केलं आहे.

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 RJD leader Tejashwi Yadav criticized budget 2021