Union Budget 2021 : LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

केंद्र सरकारने 2014 मध्ये विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्के केली होती. आता ती 74 टक्के इतकी करण्यात असल्याची घोषणा अर्थसंकल्पावेळी केली. असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात एलआयसीच्या आयओपीचा उल्लेख केला.

नवी दिल्ली - Union Budget 2021 : केंद्र सरकारने 2014 मध्ये विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्के केली होती. आता ती 74 टक्के इतकी करण्यात असल्याची घोषणा अर्थसंकल्पावेळी केली. असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात एलआयसीच्या आयओपीचा उल्लेख केला. तसंच पुढच्या वर्षी अनेक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक होईल असंही त्यांनी सांगितलं.

BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार 

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या आयओपीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपीनी असलेल्या एलआयसीमधील भागिदारी विकण्याआधी त्याच्या मूल्यांकनासाठी अॅक्चुरिअल कंपन्यांकडून अर्ज मागवले जातील. तसंच आयओपीच्या प्रक्रियेसाठी सल्लागारांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे.

Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जीवन विमा प्राधिकरणाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये एलआयसीचे समभाग शेअर बाजारात आणले जाणार आहेत असं सांगितलं आहे. यंदा एलआयसीवर आयोपी आणला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. एलआयसीचा आयओपी जवळपास 70 हजार कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Budget 2021: काँग्रेसचे लोकसभेत काळे गाऊन; कृषी कायद्यांना विरोध

एलआयसीच्या एकूण मालमत्तांचे मूल्य सुमारे 13 लाख कोटी इतके आहे. याच्या 10 किंवा 15 टक्के समभागांची विक्री करून सरकार पैसा उभा करण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीच्या आयोपीची घोषणा केली. यासोबतच इतर काही कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 Updates LIC Iop Nirmala Sitharaman