Budget 2021 : जाणून घ्या निर्मला सीतारमण यांच्या परीक्षेची वेळ!

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. त्या तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे चॅलेंज मोदी सरकारसमोर आहे. जगासह देश कोरोनाच्या संकटातून सावरत असताना आता सर्वांच्या नजरा आगामी अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत. शेती, उद्योग, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी सरकार काय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर आरोग्य क्षेत्रावर सरकारचा अधिक भर असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय जाणून घेऊयात अर्थसंकल्प किती तारखेला आणि किती वाजता सादर करण्यात येणार आहे यासंदर्भातील आवश्यक माहिती... 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. त्या तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय पावले उचलणार हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होत असते. निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून कोणत्या घोषणा होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या भाषणाला कधी सुरुवात होणार याचीही देशवासिंयाना उत्सुकता असेल.  

Budget 2021: इन्कम टॅक्स पेअर्संना दिलासा मिळणार का?

अर्थसंकल्पीय भाषण कधी सुरु होणार आणि कुठे पाहता येणार

निर्मला सीतारमण सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा लाईव्ह टीव्हीवर याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. वेगवेगळ्या युट्यूब चॅनेलसह तु्म्ही ई सकाळच्या माध्यमातूनही अर्थसंकल्पासंदर्भातील अपडेट्स मिळवू शकता.  

अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात

यंदाच्या वर्षात दोन टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात अधिवेशन होईल. त्यानंतर चर्चेसाठी अवधी मिळावा म्हणून विश्रांतीसह 2 मार्च ते 3 एप्रिल असे अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 you know About FM nirmala sitharaman speech Date time schedule and other details