Budget 2023 : डिव्हिडंड बाबत अर्थमंत्र्यांचं मोठं विधान; सरकारला RBI अन् बँकांकडून मिळणार...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
Budget 2023
Budget 2023Sakal

Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सर्व क्षेत्रांचा समावेश असलेल्या अनेक मोठ्या घोषणा केल्या. यादरम्यान त्यांनी आरबीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मिळालेल्या लाभांशाचा अंदाजही दिला आहे.

या अंतर्गत सरकारला 48,000 कोटी रुपयांच्या लाभांशाची अपेक्षा आहे. सरकारी कंपन्यांमध्ये सरकारचा मोठा हिस्सा आहे, अशा परिस्थितीत, जेव्हा सरकारी कंपन्या लाभांश जाहीर करतात, तेंव्हा भागधारकांना त्याचा फायदा होतो.

Budget 2023
Budget 2023 : पारदर्शकता कशी हवी हे जगाला दाखवून दिलं; शिंदे गटाची अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मधील एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चाचा तपशील दिला. या अंतर्गत एकूण 45 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर एकूण प्राप्ती 27.2 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, वित्तीय तूट जीडीपीच्या 5.9 % असण्याचा अंदाज आहे.

7 सरकारचे बजेट प्राधान्यक्रम :

अर्थमंत्र्यांनी आज आपला पाचवा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी याला अमृतकालचा अर्थसंकल्प म्हटले आणि 7 प्राधान्यक्रमांचा उल्लेख केला.

Budget 2023
Union Budget 2023: बजेट गरिबांच स्वप्न पुर्ण करणार; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

सर्वसमावेशक वाढ, वंचितांसाठी प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता वाढवणे, हरित वाढ, तरुण आणि आर्थिक क्षेत्र हे प्राधान्यक्रम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com