
Union Budget 2025 Marathi News : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथीसाठी कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भूरळ घातल्याचं दिसतंय. कारण उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी लक्ष्मीचं नाव घेत याचे संकेत दिले आहेत.