"तुमच्याच साठी सांगत होतो पण ऐकलं नाही..केलीच मनमानी...आता पडले ना महागात ...." 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित आहे. याकाळात नाशिक शहर-जिल्ह्यातही संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसेच, विनाकारण वाहनांवर फिरण्यासही परवानगी नव्हती. असे असले तरी बऱ्याच लोकांकडून मनमानी प्रकार घडल्याने त्यांनाच आता ते महागात पडले आहे.

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित आहे. याकाळात नाशिक शहर-जिल्ह्यातही संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसेच, विनाकारण वाहनांवर फिरण्यासही परवानगी नव्हती. असे असले तरी या काळात मास्क न वापरता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

लॉकडाऊनमध्ये उल्लंघनाचे 10 हजार गुन्हे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर-जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये संचारबंदी-जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 10 हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर, विनाकारण घराबाहेर पडून वाहनावर फिरणाऱ्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारत सुमारे अडीच वाहने शहर-जिल्हा पोलिसांनी जप्त केली आहेत. यात शहरात सर्वाधिक वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. 

अडीच हजार वाहने जप्त 
नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये 5 हजार 933 नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील सर्वाधिक 1 हजार 48 गुन्हे गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल आहेत. याचप्रमाणे, विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्यांविरोधातही बडगा उगारण्यात आला असून, 2 हजार 163 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु असून, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही या नियमांकडे दुर्लक्ष करुन शहरात वावरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहे. परिमंडळ एकमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 3 हजार 803 आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2 हजार 130 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक आहे. तरीही काही नागरिक मास्क वापरत नसल्याने 1 हजार 568 नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

जिल्ह्यातही सुमारे 5 हजार गुन्हे 
लॉकडाऊन काळात नियमांचे पालन न करणाऱ्या पाच हजार बेशिस्तांवर ग्रामीण पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाऊन दरम्यान जिल्हाभरात पोलिस यंत्रणेकडून सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या तब्बल 4 हजार 987 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर, विनाकारण फिरणाऱ्या चालकांची 631 वाहने जप्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, विनाकारन घराबाहेर पडू नये, अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक सुविधेसाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सींगचे पालन आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

* पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात दाखल गुन्ह्यांची संख्या) : 
आडगाव (206), म्हसरुळ (183), पंचवटी (292), भद्रकाली (753), सरकारवाडा (891), गंगापूर (1048), मुंबईनाका (430), अंबड (290), इंदिरानगर (291), सातपूर (547), उपनगर (325), नाशिकरोड (439), देवळाली कॅम्प (238) 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

*संचारबंदी-जमावबंदीचे गुन्हे : 5933 
* वाहन जप्ती : 2163 
* मास्क न वापरणे : 1568 
* जिल्ह्यातील संचारबंदी-जमावबंदीचे गुन्हे : 4987 
* वाहन जप्ती : 631 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10,000 offenses of violation in lockdown in nashik marathi news