
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता नाशिक शहरावर कोरोनाचा फास आवळताना दिसू लागले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1690 कोरोनाबाधीत रुग्ण असून कोरोनाबळींची संख्या 102 वर पोचली आहे.
नाशिक, पिंपळगाव व दापूरमध्ये तिघांचा मृत्यू
मंगळवारी (ता. 9) दिवसभरात 43 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात, नाशिक शहरातील 34 आणि मालेगावातील सहा रुग्णांचा समावेश आहे. जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील वृद्धास रविवारी (ता. 7) रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक शहरातील मृतांची संख्याही 22 झाली आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालांनुसार जिल्ह्यात 43 बाधित रुग्णांची भर पडली आहे. यात नाशिक शहरातील 34 रुग्णांसह मालेगावात सहा, इगतपुरीत एक, तर येवल्यात 72 वर्षीय वृद्ध आणि पिंपळगाव बसवंत येथील सोमवारी रात्री मृत्यू झालेल्या 55 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. मालेगावमधील डॉक्टर महिलेसह चार नवीन रुग्ण आढळले. त्यात तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
शहरात वाढले 34 रुग्ण
नाशिक शहरातील नाईकवाडीपुरा येथील 70 वर्षीय वृद्धासह पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) व दापूर (ता. सिन्नर) येथील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या 102 वर पोचली आहे. तर, मंगळवारी (ता. 9) दिवसभरात 43 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात, नाशिक शहरातील 34 आणि मालेगावातील सहा रुग्णांचा समावेश आहे. गायकवाडनगर (मुंबई नाका) परिसरातील 84 वर्षीय वृद्धावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काठे मळ्यातील 51 व 24 वर्षीय रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून, त्यांच्यावर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण झालेल्या भिवंडी (मुंबई) येथील 26 वर्षीय डॉक्टर महिलेने नांदगाव ते नाशिक असा प्रवास केलेला असून, त्यांच्यावर समाजकल्याण वसतिगृहातील कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत.
पेठरोड भागातील आणखी तिघे पॉझिटिव्ह
जयदीपनगरमधील 21 वर्षीय तरुणानेही नांदगाव-नाशिक प्रवास केलेला आहे. याच परिसरातील 48 वर्षीय महिला, तसेच पंचवटीच्या सरदार चौकातील 15 वर्षीय मुलगी व 38 वर्षीय महिला या मायलेकींसह 21 आणि 40 वर्षीय महिलेलाही याच बाधित रुग्णांमुळे लागण झाली आहे. पंचवटीच्या नागचौकातील 60 वर्षीय वृद्ध, 36 व 27 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, या दोघीही यापूर्वी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या संपर्कातील आहेत. सातपूर कॉलनीतही एकाच कुटुंबातील 40 वर्षीय रुग्ण व 13 आणि 15 वर्षांच्या दोन बाधित मुलीही जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. महात्मा नगर, कोकणीपुरा व मेरीतील प्रत्येकी एक आणि पेठ रोड भागातील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.