तब्बल १०३ वर्षे जगलेले निरोगी वारकरी! बाबांना जणू माहीतच नाही आजार आणि दवाखाना

संतोष विंचू
Friday, 25 December 2020

तब्बल १०३ वर्षे जगलेले हे वारकरी वार्धक्यातही निरोगी राहिले हे विशेष! बाबांना आजार आणि दवाखाना जणू माहीतच नाही, इतके त्यांचे शरीर सुदृढ होते. आयुष्यभर शेतकऱ्यांचे हित जपताना इतरांना नेहमी मदतीचा हात देणारे, पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणारे, कोणत्याही मोहात स्वतःला न अडकवता अगदी स्वच्छंदीपणे व मोकळ्या मनाने जगणारे आडगाव चोथवा येथील असे हे सोपानराव खोकले...

आडगाव (जि.नाशिक) : तब्बल १०३ वर्षे जगलेले हे वारकरी वार्धक्यातही निरोगी राहिले हे विशेष! बाबांना आजार आणि दवाखाना जणू माहीतच नाही, इतके त्यांचे शरीर सुदृढ होते. आयुष्यभर शेतकऱ्यांचे हित जपताना इतरांना नेहमी मदतीचा हात देणारे, पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणारे, कोणत्याही मोहात स्वतःला न अडकवता अगदी स्वच्छंदीपणे व मोकळ्या मनाने जगणारे आडगाव चोथवा येथील असे हे सोपानराव खोकले...

१०३ वर्षांचे निरोगी वारकरी :​ वार्धक्यात ही विठ्ठलाच्या चरणी ते नतमस्तक

आडगाव चोथवा येथील सोपानराव खोकले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले असले, तरी त्या काळातही शिक्षण घेतले. त्यांनी श्रीरामपूर तालुक्यात शेती महामंडळात हयातभर नोकरी केली. नोकरी करताना नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणारे हे व्यक्तिमत्त्व असल्याने ते सर्वांचे लाडके होते. विशेष म्हणजे नोकरी करतानाही आयुष्यभर त्यांनी पंढरपूरची वारी चुकवली नाही. वार्धक्यात ही विठ्ठलाच्या चरणी ते नतमस्तक होत होते. गंगागिरी महाराजांचे ते निस्सिम भक्त असल्याने त्यांच्या विचारांच्या शिदोरीचा व संस्काराचा पगडा त्यांच्या मनावर होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबही अतिशय सोज्वळ स्वभावाचे आणि बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आहे. 
तब्बल १०३ वर्षे जगलेले हे वारकरी वार्धक्यातही निरोगी राहिले हे विशेष! बाबांना आजार आणि दवाखाना जणू माहीतच नाही, इतके त्यांचे शरीर सुदृढ होते. वार्धक्यात कापसे पैठणीत बसून ते सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि येणाऱ्याचे तितक्याच प्रेमाने स्वागतही करायचे. डगाव चोथवा येथील सोपानराव खोकले यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी (ता. २५) त्यांचा दशक्रिया विधी होत आहे, त्यानिमित्ताने हा परिचय... 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

सर्वांशी आदराने बोलणं आणि सर्वांना समजून घेणे

बाबांना दोन मुले असून, दत्तात्रय हा मोठा मुलगा आडगाव चोथवा येथे शेती करतो, तर दिलीप (दाजी) खोकले येवल्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील लोकप्रिय कापसे पैठणीचे संचालक आहेत. त्यांना चार मुली असून, त्याही वडिलांप्रमाणेच सुसंस्कारित आहेत. वडिलांच्या संस्काराची शिदोरी मुलांवर असल्याने सर्वांशी आदराने बोलणं आणि सर्वांना समजून घेणे हे या कुटुंबाचे वैशिष्ट्ये आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

निधनाने खोकले व कापसे कुटुंबाचा मार्गदर्शक हरवला
बाबा माझ्या बहिणीचे सासरे असले तरी माझ्यासाठी जणू ते मित्रच होते. आपुलकीने आणि प्रेमाने बोलताना त्यांचा सल्ला नेहमीच मला उपयुक्त असायचा, अशी आठवण कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे आवर्जून सांगतात. तब्बल १०३ वर्षे निरोगी आयुष्य जगणे हा खरंच चमत्कारच म्हणावा तो बाबांनी करून दाखवला आहे. इतरांपेक्षा वेगळ्या असलेला या वारकऱ्याच्या निधनाने खोकले व कापसे कुटुंबाचा मार्गदर्शक हरवला आहे. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 103 year old healthy Warkari Sopanrao khokle aadgaon nashik marathi news