काय सांगता! डाळिंब क्षेत्रातून चक्क १२ लाख रुपये उत्पन्न; शेतकऱ्याची प्रतिकूलतेवर मात 

बापूसाहेब वाघ
Wednesday, 30 September 2020

कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी ध्येय महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करत डाळिंब लागवडीस योग्य नसलेली जमीन असताना जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शांताराम शिंदे यांनी डाळिंब पीक बहरात आणून त्यातून १२ लाख रुपये उत्पन्न मिळविले. 

नाशिक / मुखेड : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी ध्येय महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करत डाळिंब लागवडीस योग्य नसलेली जमीन असताना जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शांताराम शिंदे यांनी डाळिंब पीक बहरात आणून त्यातून १२ लाख रुपये उत्पन्न मिळविले. 

जळगाव नेऊरचे शांताराम शिंदे यांची प्रतिकूलतेवर मात 

शांताराम शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या एक एकर क्षेत्रात चारशे सेंद्रिय भगवा वानाचे डाळिंब झाडांची लागवड केली. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यात दररोज पावसामुळे बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करत डाळिंब पीक बहरात आणले. डाळिंब पिकाची विशेष काळजी घेतल्याने टप्प्याटप्प्याने सरासरी ७०० क्रेट्स डाळिंब माल नाशिक येथील मार्केटमध्ये विक्री केला. त्यात चार हजार रुपये प्रतिक्रेट्स हा सर्वाधिक भाव श्री. शिंदे यांच्या डाळिंबाला मिळाला. त्या खालोखाल मालाच्या गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार ते तीन हजार प्रतिक्रेट्स भाव मिळाला. बागेतील पूर्ण माल विक्री केला. एक एकर क्षेत्रात जवळपास १२ लाख रुपये हाती आले. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एक एकर डाळिंब क्षेत्रातून १२ लाख रुपये उत्पन्न 
डाळिंब बागेसाठी जळगाव नेऊर येथील कृष्णार्जुन कृषी सेवा केंद्राचे संचालक भाऊसाहेब शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले, असे डाळिंब उत्पादक श्री. शिंदे यांनी सांगितले. उत्पादक शांताराम शिंदे, संगीता शिंदे, संभाजी शिंदे, वनिता शिंदे यांनी डाळिंब पिकासाठी विशेष परिश्रम घेतले. जगन शिंदे, अनिता शिंदे, रघुनाथ शिंदे, सुनीता शिंदे आदी शिंदे कुटुंबातील बंधू कांदे, मका व इतर पिकांंचे उत्पन्नासाठी प्रयत्नशील असतात. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांनी आधुनिक शेतीची कास धरत अतिशय मेहनतीने डाळिंब पिकातून भरघोस उत्पन्न मिळविले. त्यामुळे जिल्हा बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आली. -तुकाराम शिंदे, माजी सरपंच, जळगाव नेऊर 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 lakh income from pomegranate sector jalgaon neur nashik marathi news